सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. : अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्या ही येथनच उगम पावतात. वारणा आणि कोयना नद्यांवर धरणाची निर्मिती करण्यात आली असून कोयनेच्या पाण्यावर महत्वाचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. पश्चिम - दक्षिण महाराष्ट्रातील शेती या पाण्यावर अवलंबून आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर निम सदाहरित वृक्षराजीने नटलेला आहे. येथे वाघांचे अस्तित्त्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्त्वासाठी अत्यंत सुरक्षित । मानला जातो. असं असलं तरी ऊंचसखल डोंगर रांगाचा हा प्रदेश असल्याने येथे व्याघ्र दर्शन दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प विदर्भाबाहेरील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौ.कि.मी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.कि.मी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात सातारा सांगली आणि कोल्हापर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्याचा जागतिक पातळीवर नोंद ही आहे. सह्याद्री व्याघ्र - प्रकलपामुळे पर्यटनाला चालना मिळन स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प