महादेव केबलनेटचे व्यापारी नरेश रोहडा ह्याला त्याच्या कार्यालया समोरचं तीन जणांनी पत्रकार असल्याचे सांगत, आमच्या संघात धर्मेंद्र दूबे व दिलीप मिश्रा असून महिना ८०,०००/- रुपयांची मागणी केली. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश रोहरा गोल्ड स्मगलिंग करीत असल्याची आशंका व्यक्त करणारी बातमी धर्मेंद्र दुबे आणि दिलीप मिश्रा यांनी केलेल्या बातमीत व्यक्त केली होती. या बातमी नंतर दुबे याना नरेश रोहरा याने एका व्हाट्सए ग्रुपवर धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. महिन्याभरापूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील शर्मा नामक गुंडाचे पाय हातोडा मारून तोडले होते. त्यावेळी सनील शर्मा याने आमदार कुमार आयलानी यांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले.
गोल्ड स्मगलिंगची बातमी लावल्यामुळे पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल