| मुरबाड मध्ये आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुरबाड : मुरबाड शहरा मध्ये परदेशातून जाऊन आलेल्या रुग्णाला होमकोरोनटाईन ठेवण्यात आले होते १२ फोटो : संग्रहित व्या दिवशी त्याची टेस्ट केल्या नंतर तो पॉझिटिव्ह आढळला. सदर रुग्ण हा कामानिमित्त बर्म्युडा येथे गेलेला होता. त्याला मुंबई मधिल भाभा हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले आहे व त्याच्या फॅमिलीचे वैदयकीय विभागाकडून चेकअप करुन त्यांना सुद्धा कोरोंटाईन करुन ठेवले आहे. मुरबाड शहारासह तालुका ३ दिवस पूर्णपणे बंद करण्यात आले असून ज्या परिसरात सापडला आहे तो परिसर ३ किमी पर्यंत सील करण्यात आला आहे. त्यामुळे मुरबाड शहरा मध्ये आणि मुरबाड तालुक्यातून मुरबाड शहरा मध्ये कोणीही घरा बाहेर जाऊ नये असे मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले आहे. मुरबाड मधे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कृपया कोणीही घराबाहेर पडू नका. आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. प्रशासनाला व पोलीसांना सहकार्य करा. - आमदार किसन कथोरे