नागरिकांनो घाबरू नका, गर्दी टाळा, काळजी घ्या, ___ घरीच थांबा, किसन कथोरेचे आवाहन

बदलापूर : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभर लॉकडाऊन मात्र काही नागरिकांच्या बेजबाबदार पणामुळे या आजारचा प्रसार वाढत आहे, गर्दी टाळणे हा यावरील एकमेव उपाय आहे, मात्र काही नागरिक राज्य व केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करत नाहीत, त्यामुळे कोरोनाला अटकाव घालणे त्रासाचे होत असले तरी, या स्थितीला घाबरून न जातानागरिकांनी गर्दी टाळावी व घरीच थांबणे गरजेचे आहे. असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. मुरबाड मध्ये सापडलेला रुग्ण हा परदेशातुन जाऊन आला होता. तो होमक्वारटाईन होता. हा आजार परदेशातूनच आलेला आहे, त्याचा अधिक फेलाव होऊ नये यासाठी सामूहिक काळजी घोणे आवश्यक आहे. केंद्र सरकार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकाने आर्थिक मदती सोबत मोफत धान्य देण्याची वेंवस्था केली आहे, सरकार निकराने प्रयत्न करत आहे, आपण फक्त साथ द्यावी असे किसन कथोरे यांनी नागरिकांना आवाहन करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मतदारसंघात आरोग्याच्या सुविधा बाबत सतत लक्ष ठेऊन असल्याचे कथोरे म्हणाले.